” जसा माणूस नश्वर आहे, तसेच विचारही आहेत. एखाद्या वनस्पतीला जशी पाण्याची गरज असते. त्याप्रमाणे एखाद्या कल्पनेचा प्रसार आवश्यक असतो. अन्यथा ती सुकते आणि मरते. “

…डॉ. बाबासाहेब आंबेडकर


” जर विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टांचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला लाभतील. “

…महात्मा ज्योतिबा फुले


” जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्त्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. “

…डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आमची उद्दिष्टे

“स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट, नागपूर” (तामगाडगे ट्रस्ट यापुढे) महाराष्ट्र सार्वजनिक ट्रस्ट अधिनियम, १९५० च्या कलम १९ अंतर्गत नोंदणीकृत सार्वजनिक ट्रस्ट आहे ज्याची नोंदणी क्र. E-३५७३ (N), नागपूर.

स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट, नागपूर ची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.

  • पालक/अनाथ मुलींसाठी शैक्षणिक शिष्यवृत्तीची व्यवस्था करणे.
  • सिकल सेल अॅनिमिया रोगाशी संबंधित NGOs आणि सरकार या मधील दुवा बनून समन्वय करणे.
  • आंबेडकरी चळवळीशी संबंधित साहित्य आणि पुस्तके प्रकाशित करणे आणि समाजातील वंचित घटकांशी संबंधित अभ्यासपूर्ण लिखाण करणे.
  • एससी/एसटी/ओबीसी आणि समाजातील वंचित घटकांना शिक्षण आणि रोजगार आधारित स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात व्यावसायिक मार्गदर्शन आणि सहाय्य प्रदान करणे.
  • समाजात तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचार आणि विकासासाठी काम करणे.
  • आंबेडकरी चळवळीचे ” दस्तऐवजीकरण ” ( डॉक्युमेंटेशन हब ) तयार करणे.
  • गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत ग्रंथालये आणि अभ्यासिकांच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणे.

घोषणा

1. “अथर्व” शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना २०२६-२७.

अथर्व शिष्यवृत्ती अर्ज २०२६-२७

2. स्मृतीषेश मधुकरराव तामगाडगे मुलींसाठी शिष्यवृत्ती २०२६-२७.

मुलींसाठी शिष्यवृत्ती अर्ज २०२६-२७

आमचे चालू उपक्रम
-पुस्तकांचे मोफत वाटप
–रक्तदान शिबिरे
-सिकल सेल चाचणी शिबिरे
-औषध वितरण शिबिरे

सरकार आणि इतरांकडून पत्रे

प्रशंसा पत्रे

निमंत्रण

विषय: शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण व करियर मार्गदर्शन कार्यक्रम २०२६-२७ चे हार्दिक निमंत्रण

आदरणीय शुभचिंतकांनो,
स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट नागपुर, आपणास आमच्या वार्षिक शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण व करियर मार्गदर्शन कार्यक्रम २०२६-२७ मध्ये हार्दिक आमंत्रण देत आहे.

ट्रस्ट गेल्या नऊ वर्षांपासून गरजू व हुशार मुलींसाठी (विशेषतः अनाथ विद्यार्थिनींसाठी) शिक्षण क्षेत्रात सातत्याने कार्य करत आहे. यावर्षी आम्ही एक नवी श्रेणी सुरू करत आहोत — अथर्व शैक्षणिक शिष्यवृत्ती — जी सिकल सेल रोगां ने ग्रस्त असलेल्या, इयत्ता १०वी किंवा १२वी मध्ये चांगले गुण मिळवलेल्या मेधावी विद्यार्थ्यांसाठी आहे. यामुळे आरोग्याच्या आव्हानांना तोंड देत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणतीही अडचण येणार नाही.

कार्यक्रमाचे तपशील:
दिनांक: रविवार, २ ऑगस्ट २०२६
वेळ: दुपारी १२:३० वाजता
स्थळ: डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, आमदार निवास, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१

कार्यक्रमात उपस्थित राहणारे मान्यवर:
उद्घाटक: श्री. उन्मेष वाघ, IRS, आयुक्त, कस्टम्स, JNPT, नवी मुंबई
मुख्य अतिथी: श्री. तुकाराम जी. मुंढे, IAS, आयुक्त, खाद्य व औषध प्रशासन, महाराष्ट्र
अध्यक्ष: श्री. संदीप तामगाडगे IPS, अपर पोलीस महानिदेशक (ADGP), नागालँड.

विशेष अतिथी म्हणून विविध क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ उपस्थित राहून विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन करतील.
आपले सान्निध्य या कार्यक्रमाला अधिक अर्थपूर्ण बनवेल, अशी आम्हाला आशा आहे. कृपया आपले आगमन निश्चित करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी संपर्क साधा.

आपले आभार मानत,
ट्रस्टच्या वतीने
स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट
नागपूर.

काळजी . सर्जनशीलता. करुणा

ह्या 3 आमच्या मुख्य वचनबद्धता आहेत.

कल्पना. सचोटी. नाविन्य

आमची धोरणे आणि उद्दिष्टे पुर्तीसाठी.

आमचे सहयोगी

हे आमचे सहयोगी आहेत आणि तामगाडगे ट्रस्ट त्यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या विविध सामाजिक कार्यात सक्रियपणे गुंतलेले आहेत.

तामगाडगे ट्रस्टचे मुख्यालय, स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे प्रेरणा प्रबोधनीमध्ये नास्को मुख्यालय देखील आहे.


नॅशनल अलायन्स ऑफ सिकल सेल ऑर्गनायझेशन्स (नास्को) ही भारतातील पहिली स्वयंसेवी, ना-नफा, राष्ट्रीय संस्था आहे.
नास्को मिशन म्हणजे सिकल सेल बद्दल सामान्य लोकांमध्ये जागरूकता वाढवणे आणि सिकल सेल रूग्णांचे जीवनमान चांगले राहण्यासाठी प्रयत्न करते.
NASCO सिकल सेल अॅनिमिया एकछत्री संघटना म्हणून काम करते. विविध संघटना, स्वयंसेवी संस्था, विविध राज्यांमध्ये कार्यरत आहेत आणि नास्को सिकल सेल अॅनिमिया रुग्णांची स्थिती सुधारण्यासाठी धोरणात्मक हस्तक्षेपासाठी भारत सरकार आणि विविध राज्य सरकारांशी सक्रिय समन्वयाने दुवा म्हणून कार्य करते.

सामाजिक प्रभाव अहवाल २०२१ – २०२५

आम्ही घडवलेला प्रभाव
आजपर्यंत ३१,७५७ लोकांची तपासणी करण्यात आली*